क्राईम

पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथे तीन तलवारींसह तरूणाला अटक; जळगाव एलसीबीची कारवाई!

पाचोऱ्यात तीन तलवारींसह तरूणाला अटक; जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या तरुणाच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा टाकून बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी हस्तगत केल्या आहे. त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  संबंधित तरूणाला बुधवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. हर्षल राजपूत (वय-२०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हर्षल हा त्याच्या घरात प्लास्टिक पिशवीमध्ये तीन तलवारी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. बुधवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता पथकातील सपोनि निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रीतम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश गोसावी, लोकेश माळी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमुख ठाकूर, मोतीलाल चौधरी या पथकाने कारवाई करत संशयिताला अटक केली आहे. त्यानुसार पथकाने कारवाई करत १० हजार रुपये किंमतीच्या तीन तलवारी हस्तगत केले आहे तर पुढील तपास सुरु आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button