पाचोरा येथे बांधकाम कामगारांसाठी आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीर

पाचोरा येथे बांधकाम कामगारांसाठी आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीर
पाचोरा : पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये बांधकाम कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शिबीर २२ ते २७ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. दुपारी १.३० ते ४:३० दरम्यान शिबिरात आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनात व जनसेवक बंडू केशव सोनार यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. एच एल एल व हिंदू लॅब तर्फे कर्मचारी अमित वाणी फिरोज शेख यांनी रक्त तपासणी केली सर्व बांधकाम कामगार यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन, वजन करणे, शुगर चेक, बीपी चेक करणे, डोळ्यांची तपासणी, फुफूस चेक करणे, उंची चेक करणे या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. पाचोरा शहरातील व प्रभागातील सर्व बांधकाम कामगारांनी बंधू-भगिनींनी या शिबिराच्या लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात प्रत्येक दिवशी ३५ जणांची तपासणी करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी बंडू सोनार यांच्याशी मो. 9158509318 वर संपर्क साधावा, असे आव्हान करण्यात आले आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबदल आ. किशोर आप्पा पाटील व बंडू सोनार यांचे आभार मानले जात आहेत.



