खान्देश

गोंडगाव येथील कु.कल्याणीच्या हत्या-यास फाशीची शिक्षा द्या-

गोंडगाव येथील कु. कल्याणीच्या हत्या-यास फाशीची शिक्षा द्या-
—————————
——————————
*पासर्डी  -गोंडगाव तालुका भडगाव येथील चिमुकली कु. कल्याणी संजय पाटील या ८ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर त्या गावातीलच एका नराधमांने गेल्या आठवडय़ात तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला आहे.या घटनेतील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा,तसेच या खटल्याचे कामकाज चालविण्यासाठी सुप्रसिद्ध विधीतज्ञ व सरकारी वकील उज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यात यावी या मागन्यासाठीसाठी तसेच कल्यानीच्या आत्म्यास चिरशांती लाभवी म्हणून पासर्डी व घुसर्डी येथे  कॅण्डल रॅली🕯️चे आयोजन करण्यात आले होते तरी गावातील सर्व ग्रामस्थ (पुरुष,महिला, मुले-मुली, विद्यार्थी,विद्यार्थीनी, राजकीय क्षेत्रातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक व इतर क्षेत्रातील मंडळी यांनी मोठ्या संख्येने आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते…!! जोरदारपणे घोषणाबाजी करून सबंध परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
“चिमुकली कल्याणीची हत्या करणार्‍या नराधमाला 🎺फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”, सदर केस जलदगती न्यायालयात वर्ग करावी…! ऍड🎓उज्वल निकम साहेबांची या केसमध्ये नियुक्ती करून आरोपीला फाशी द्या…!अशा प्रकारच्या जोरदार घोषणा याठिकाणी देण्यात आल्या…! तसेच यावेळी माध्यमिक विद्यालय घुसर्डी. व जि.प.प्राथमिक शाळा पासर्डी येथील शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष सागर गढरी,उपाध्यक्ष प्रदीप पाटील, व सदस्य सौरवभाऊ चावरे,रणजित चावरे,भारत सोनवणे,कोमल चावरे,सचिन चावरे,सतीश मोकळे, श्याम गायकवाड,शुभम पाटील,निलेश पाटील,ईश्वर सोनवणे,रामदास पवार,उमेश सोनवणे,चेतन पाटील,कल्पदिप गढरी,रघुनाथ चावरे,राजेश पाटील,हर्षल गढरी, गणेश चावरे, घनश्याम पाटील,संदीप सोनवणे,गोकुळ सोनवणे,विशाल थोरात,प्रशांत पाटील, कल्पनाबाई गढरी, सूनंदाताई चावरे, लताबाई थोरात,अनुसायाबई पाटील,सरलाबाई पाटील, सुमनबाई,कल्पना चावरे, अल्का चावरे, रेखा पाटील ,स्वाती पाटील,मंगल आहिरे,मीना सोनवणे आदी महिला उपस्थित होते….!

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button