खान्देश

पाचोरा कोर्टात वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते उदघाटन!

पाचोरा कोर्टात वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते उदघाटन !

दि. 21 एप्रिल २०२३ (प्रतिनिधी) –  जळगांव नंतर जिल्ह्यातील पहिल्या पाचोरा वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हा व सत्र प्रमुख न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या याप्रसंगी पाचोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मंगला जी. हिवराळे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य तथा गार्डीयन मेंबर अॅड. अमोल सावंत, जळगांव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. केतन ढाके, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. मंगेश गायकवाड, सचिव अॅड. राजेंद्र पाटील व्यासपीठावर होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या हस्ते ई फायलिंग केंद्राचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले. पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातुन उपस्थितांना ई फायलिंगचे महत्व पटवुन सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. अॅड. अमोल सावंत व अॅड. केतन ढाके यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व वकील वृदं & महिला वकील भगिनींचे विशेष परिश्रम लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लिपिक अनिल शिंदे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पाचोरा वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. मंगेश गायकवाड यांनी मानले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button