टेस्ला कार नको; शाळेत जायला एसटी पास मोफत करा – छात्रभारती विद्यार्थी संघटनेची स्वाक्षरी मोहीम सुरू !

टेस्ला कार नको; शाळेत जायला एसटी पास मोफत करा – छात्रभारती विद्यार्थी संघटनेची स्वाक्षरी मोहीम सुरू
चोपडा (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील ग्रामीण व कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बस पास मोफत देण्याच्या मागणीसाठी **छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीमेची सुरुवात** करण्यात आली आहे.

१९ ऑगस्ट २०२५ रोजी चोपडा तालुक्यातील **उनपदेव–वाडावत दरम्यान** दुर्दैवी घटना घडली होती. पाचवीतील एका विद्यार्थ्याला पास संपल्यामुळे भर पावसात एसटी बसमधून उतरवताना अपशब्दांचा वापर करण्यात आला. अशा घटना राज्यात वारंवार घडत असून, बस पास परवडत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील पूर्वी घडल्या आहेत.
**“आम्हाला टेस्ला कार नको, फक्त शाळेत जायला मोफत एसटी पास हवा”**, अशी भावनिक हाक विद्यार्थ्यांनी दिली. गावखेड्यातील व पाड्यावरील विद्यार्थ्यांशी प्रवासादरम्यान सहानुभूतीपूर्वक वर्तन करण्याचे तसेच परिवहन मंडळाला सक्त आदेश देण्याची मागणी करण्यात आली.
वर्तमानपत्रातून समजलेल्या एका बातमीत एका उद्योगपती आजोबांनी आपल्या नातवाला शाळेसाठी टेस्ला कार भेट दिल्याचे नमूद करून, छात्रभारतीने भावनिक आवाहन केले –
आजोबा, आम्हाला टेस्ला कार नको, पण आम्ही सुद्धा आपल्या नातवाच्या वयाचेच आहोत. आम्हाला फक्त सन्मानाने शाळेत जाण्यासाठी एसटी पास मोफत करा.”**
या आंदोलनावेळी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष **भूषण पाटील**, तसेच पदाधिकारी **दिगंबर सुकलाल पाटील, रुपेश भिकन पाटील, सागर पुरुषोत्तम कुंभार, चेतन दत्तात्रय सोनार** आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



