मराठा सेवा संघाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी एस के पाटील यांची निवड!

मराठा सेवा संघाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी एस के पाटील यांची निवड!
पाचोरा (प्रतिनिधी) :- आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा कार्यकारणी ची सभा मराठा भवन जळगाव येथे पार पडली या प्रसंगी शिवश्री सुरेंद्र पाटील प्रदेश उपाध्यक्ष म, से, सं चंद्रशेखर शिकरे प्रदेश महासचिव रामदादा पवार व ईतर सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते .
प्रसंगी प्रथम जिजाऊंच्या प्रतीमेस पुष्प अर्पण करुन जिजाऊ वंदना म्हणुन कार्यक्रमास सुरूवात झाली. जिल्ह्यातील उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचा परीचय करण्यात आला . परिचय कार्यक्रमानंतर संघटनेच्या कामकाज, जबाबदारी, आदी बाबतीत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले . याचवेळी कार्यक्रमात नवनियुक्त्या पदाधिकारी याना नियुक्ती पत्र देऊन खालील प्रमाणे नियुक्ती जाहीर करण्यात आल्या जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, या विभागाचे पदाधिकारींची निवड प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्याध्यक्ष रामदादा पवार , प्रदेश सहसचिव चंद्रशेखर भदाणे, माजी विभागीय अध्यक्ष सुरेश पाटील , अभियंता सोसायटीचे अध्यक्ष इंजिनिअर साहेबराव पाटील , संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष , डॉ अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यकारणी पुढीलप्रमाणे सुधीर आबा पाटील जिल्हाध्यक्ष ( चाळीसगाव) , एस के पाटील जिल्हा कार्याध्यक्ष (रा.पाचोरा) , सचीन पाटील उपाध्यक्ष (पारोळा) , रविंद्र पाटील उपाध्यक्ष (भडगाव) , नरेंद्र पाटील सचिव (भडगाव) यावेळी , प्रा. सुनील गरुड , प्रा. राजेंद्र देशमुख , चंद्रकांत देसले , सचिन पाटील संदीप पवार मधुकर पाटील संदीप सोनवणे , हर्शल गरुड , यु.जे.पाटील , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा लीनाताई पवार , योगेश पाटील, यांच्या सह जिल्हा भरातील पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस ए पाटील पाचोरा यांनी केले



