खान्देश

जनसेवकाच्या सेवेला जनतेची मिळाली साथ – दक्षिणेश्वर हनुमंतरायाच्या महाआरतीतून नगरसेवक संकल्प दि. 15 जुलै 2025 रोजी पाचोरा शहरातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले एक निस्वार्थ जनसेवक – बंडू सोनार

जनसेवकाच्या सेवेला जनतेची मिळाली साथ – दक्षिणेश्वर हनुमंतरायाच्या महाआरतीतून नगरसेवक संकल्प दि. 15 जुलै 2025 रोजी पाचोरा शहरातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले एक निस्वार्थ जनसेवक – बंडू सोनार

दि. 15 जुलै 2025 रोजी पाचोरा शहरातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले एक निस्वार्थ जनसेवक – बंडू केशव सोनार – यांच्यासाठी एक वेगळाच भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवास मिळाला.
नवजीवन विद्यालयाजवळ, तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी संकुलच्या मागे वसलेले इच्छापूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिर – हे पाचोरा शहरातील श्रद्धेचे केंद्र. असं मानलं जातं की येथे केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. प्रत्येक मंगळवार आणि शनिवार येथे श्रद्धेची मोठी गर्दी असते. आणि याच पवित्र ठिकाणी, जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने, एक संकल्प महाआरती पार पडली – जनसेवक बंडू सोनार यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचे तिकीट मिळावं, आणि प्रचंड मतांनी ते विजयी व्हावेत, हा संकल्प नागरिकांनी हनुमंतरायाच्या चरणी अर्पण केला!
ही आरती बंडू सोनार यांच्या हस्ते संपन्न झाली. विशेष म्हणजे बंडू सोनार  यांच्याकडे कोणतेही पद नाही, कोणतीही राजकीय लालसा नाही – तरी देखील, ते आजवर निःस्वार्थपणे अहोरात्र लोकसेवेत गुंतले आहेत. रुग्णसेवा, गरजूंची मदत, नागरी समस्या असोत किंवा सामाजिक कार्य – कुठेही ते मागे राहत नाहीत.
यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. जय श्रीराम, जय हनुमान! च्या गजरात वातावरण भारलेलं होतं. या संकल्प आरतीत अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते –
गोपाल बन्सी लोहार, प्रशांत पाटील, अशिष लोहाटी, भाऊळ चौधरी, बापू चौधरी, शुभम शिंदे, उदय महाराज, लकी कळमकर, राज सोमवंशी आणि हनुमानाचे सर्व भक्तगण.
या आरतीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे – पद नसतानाही जो जनतेसाठी झटतो, तोच खरा जनसेवक असतो. आणि असा जनसेवक जर पदावर आला, तर जनता कशी त्याच्या मागे उभी राहते, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button