खान्देश
कासोदा येथे तलवार बाळगणाऱ्या इसमास अटक

कासोदा येथे तलवार बाळगणाऱ्या इसमास अटक
कासोदा, दि. २९ ऑगस्ट: येथील फरकांडे चौफुलीजवळ एक इसम तलवार घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून राघव रामा कुवर (रा. कोळबल्ली चेंबर, गलवाडा रस्ता, कासोदा) याला ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत , पो.उ.निरीक्षक धर्मराज पाटील , रामकृष्ण पाटील , नितीन सूर्यवंशी , राकेश खोंडे , श्रीकांत गायकवाड , निलेश गायकवाड , योगेश पाटील , दिपक देसले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



