न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जय किरण प्रभाजी शाळेत आषाढी एकादशी निमित्त “एकादशी वारी” कार्यक्रम संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जय किरण प्रभाजी पाचोरा येथील शाळेत दिनांक 28 जून 2023 रोजी आषाढी एकादशी निमित्त शाळेत सकाळ सत्रातील व दुपार सत्रातील विद्यार्थी व शिक्षकांचा कार्यक्रम लहान-मोठ्या बाळ गोपाळांसोबत आषाढी एकादशी निमित्त एकादशी वारी कार्यक्रम संपन्न केला गेला.
या कार्यक्रमात सर्व लहान-मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विठू माऊली व वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. छान प्रकारे दिंडी चा कार्यक्रम काढण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनीही या वारीत लेझीम खेळून बाल गोपालानसमवेत आनंद घेतला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा ,उपाध्यक्ष गिरीषजी कुळकर्णी,सचिव जीवनजी जैन,स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवानी व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील , सी.ई.ओ.अतुल चित्ते पर्यवेक्षिका विद्या थेपडे यांनी सर्व शिक्षक-शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.



