एकास दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस सह घेतले ताब्यात पाचोरा पोलिसांची कारवाई !
पाचोरा – (प्रतिनिधि)- एकास दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस सह घेतले ताब्यात पाचोरा पोलिसांची कारवाई दिनांक 26 रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाने पो.उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोहेकॉ. राहुल काशिनाथ शिंपी, पो.कॉ. दिनेश महादु पाटील यांचे पथक पाचोरा पोलीस ठाणे हददीतील घडणारे गुन्हे उघडकिस आणणेसाठी तसेच फरार आरोपीतांचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना खबरी कडून गोपनीय माहिती बातमी मिळाली की, ए ,१ काटा जारगांव चौफुली, पाचोरा परिसरात एक इसम त्याचे कब्जात गावठी कटटे घेवुन तो कुठेतरी गुन्हेगारी कारवाया करण्याच्या तयारीत आहे. सदर संशयीत इसमाचा शोध घेवुन त्याचे जवळील अनधिकृत अग्नीशस्त्रे (गावठी कटटे पिस्तुल) जप्त करणे आवश्यक होते.पथकाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. प्राप्त माहितीनुसार स्थानीक दोन पंचाना बोलावुन कार्यवाही पथकाने जारगाव येथील ए -१, काटा, याचे आडोशाला थांबुन तेथे एक इसम येवुन संशयीतरित्या वावरत व त्याचे कंबरेस वारंवार हात लावत असतांना दिसला. बातमी प्रमाणे खात्री होताच पोलिसांनी जहुरभाई रेडीअर्स, दुकानाजवळ १६.३० वा. जागीच पकडले. सदर इसमांस ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव अरबाज खान जहूर खान, वय. २४ वर्षे, रा.अक्सा नगर, जारगांव, पाचोरा, असे सांगीतले पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात पॅन्टच्या खिश्यात खालील वर्णनाचे पिस्टल व राउंड , २०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल, सिंगल बोअरचे, बोअरच्या खाली चेंबर, पिस्टल ट्रिगर लोखंडाचे, पिस्टलला लोखंडी मॅग्झीन अशा वर्णनाचे जु.वा.किं.सु. २०,०००/- रुपये किमतीचे पितळी कैंप असलेले चार जिवंत काडतुस, सदर काडतुसचे अशा वर्णनाचे जु.वा.किं.सु.४२,०००/- रु चे मिळुन आले.आरोपीस पोलीस ठाणे येथे आणुन त्याचे विरुध्द पाचोरा पोलीस ठाणे गु.रजि.क्रमांक ४०/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन यातील आरोपी यांस अटक करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा तपास पो.उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके हे वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली करीत आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक , माहेश्वर रेडडी,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलिस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, पो.हे.कॉ. राहुल काशिनाथ शिंपी, पो.कॉ. दिनेश महादु पाटील यांनी पार पाडली.



