जळगांव जिल्हा

चोराच्या उलट्या बोंबा तर आमदार हेच खरे भूखंड माफिया – अमोल शिंदे

चोराच्या उलट्या बोंबा तर आमदार हेच खरे भूखंड माफिया – अमोल शिंदे

पाचोरा-येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. या निवडणूक दरम्यान 24 एप्रिल रोजी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी घेतलेल्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्यावर पुराव्यानिशी आरोपांच्या व्हिडीओ व पुराव्यानिशी मतदारांसमोर सादर केले होते व दोघांवर गंभीर आरोप केले होते .  आरोपांचे खंडन करण्या ऐवजी  आमदार किशोर पाटील यांनी आज तुळजाई जिनिंग येथे झालेल्या त्यांच्या मेळाव्यात आरोपांचे खंडन न करता  शिवराळ भाषेत अमोल शिंदे यांचा लचके तोडणा-या कु…. त्र्या , उपरे यासाख्या उपमा देत  समाचार घेतला. म्हणूनच आमदारांच्या या प्रतिकियेवर प्रत्युत्तर देताना अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” असून आगामी काळात खरा “भूखंड माफिया चोर” म्हणजे आमदार किशोर पाटील हेच आहेत -असे ठासून पत्रकार परिषदेत सांगितले .

पुढे बोलताना ते म्हणाले कि जर आमदारांना माझा आरोप खोडायचा असेल तर त्यांनी पुराव्यानिशी जाहीर बोलावे, अन्यथा आमचे आरोप मान्य आहेत असे आम्ही समजू खडे बोल सुनावले.
२४ रोजी झालेल्या भाजपा पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलच्या मेळाव्यात तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या अपहार व अनियमितता बाबत आजी-माजी आमदारांवर पुराव्यासह आरोप केले होते. आज तारीख 26 रोजी तुळजाई जिनिंग मोंढाळा रोड येथे दुपारी  झालेल्या आमदार पाटील यांच्या मेळाव्यात त्यांना आरोपांचे खंडन होईल असे वाटले होते .

आमच्या आरोपांना उत्तर देऊ न शकणारा आमदार हा एक नंबरचा खोटारडा आहे, असे म्हणत आमदारांचे भाषण म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” आहेत. तसेच खरा “भूखंड माफिया चोर” म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील हेच आहेत हे आम्ही सिद्ध करून दाखवू असे अमोल शिंदे यांनी सांगितले.

मात्र प्रत्यक्षात असे न होता आमदारांनी केवळ शिवराळ भाषा वापरून त्यांच्यावर पुन्हा नवीन आरोप केले. आमदारांच्या या नवीन आरोपांच्या बाबतीत अमोल शिंदे यांनी आज सायंकाळी चार वाजता बिजीपी कार्यालय भडगाव रोड येथे  तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपण त्यांच्यावर व त्यांनी आपल्यावर केलेले आरोप सिद्ध करावे असे खुले आव्हान दिले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अमोल शिंदे यांनी त्यांच्या मेळाव्यात उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे पुन्हा एकदा वाचन करून दिले. या सर्व आरोपांचे स्पष्टीकरण करत असताना अमोल शिंदे यांनी आमदारांचा अत्यंत शांत पद्धतीने खरपूस समाचार घेतला.

आमदारांवर व त्यांच्या संचालकांवर पुराव्यानिशी आरोप करताना अमोल शिंदे यांनी आमदार पाटील यांना “इज्जत व नैतिकता गमावलेला माणूस”, “खोटे बोलण्याचा शुद्ध धंदा असलेला माणूस”, “खूप कमी ज्ञान असलेला आमदार”, “अपूर्ण माहितीवर बोलणारा आमदार” – असे विविध विशेषण लावलीत. याशिवाय मेळाव्यात बोलताना आमदार शुद्धीवर दिसत नसल्याचे सांगत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पराजय दिसत होता असेही ते स्पष्ट म्हटले.
आमदार पाटील यांनी आजच्या मेळाव्यात बाजार समितीच्या पाठीमागील भूखंड व शिंदे परिवाराचा मोंढाळा रोडवर मोठी शेती आहे, दोन नवीन आरोप केले. या आरोपांची खिल्ली उडवत अमोल शिंदे यांनी सांगितले की, “मार्केटच्या पाठीमागील जागा अमोल शिंदे यांनी घेतल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे. आणि मोंढाळा रोडवर बाजार समिती आवारला योग्य अशी शिंदे परिवाराची 20 ते 25 एकर शेती असेल तर ती सिद्ध करावी.

आम्ही आमच्या स्व:खर्चाने ती शेती आमदाराला मोफत दान करू”- असे सांगत आमदाराच्या आरोपाची हवाच काढून घेतली. आमदाराचे पॅनल या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाला राहणार असून पराभूत मानसिकतेतून ते आरोप करीत आहेत, असे अमोल शिंदे यांनी यावेळी सांगितले. भडगाव रोडवरील अटल भाजपा कार्यालय पाचोरा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे ,भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, कैलास आप्पा चौधरी,प्रदीप पाटील,जगदीश तेली,व इतर पदाधिकारी तसेच शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार उपस्थित होते.

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button