खान्देशजळगांव जिल्हा

जळगावातील धक्कादायक घटना घरात येताच मुलाला वडिल नको त्या अवस्थेत दिसले अन्…..!

जळगाव : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ राहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने चिठ्ठीही लिहून ठेवली आहे.  त्यात त्रास देणाऱ्या चौघांची नावं लिहली आहेत. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उमेश एकनाथ ठाकूर (वय-३७ रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे.  उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी आणि दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ वास्तव्याला होता. बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

मुलगा ओम हा घरात आल्यावर त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले, त्याने आरडाओरड केल्यावर उमेश याची पत्नी आणि आईने आरडाओरड ऐकताच धाव घेतली. त्यांनी उमेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेवून उमेशला खाली उतरवलं आणि तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button