क्राईम

हद्द्दपारीचे आदेश न पाळणा-या व्यक्तीस अटक व गुन्हा दाखल !

पाचोरा (प्रतिनिधी )- भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून, भडगांव पोलीस स्टेशन अंतर्गत भडगांव तालुक्यातील वाक येथील हददपार इसम संजय सुरेश त्रिभुवन टा. वाक ता. भडगांव

 

   जाहिरात

हा मा. उपविभागीय दंडाधिकारी . पाचोरा भाग, पाचोरा यांच्या आदेशाने ऑगस्ट 2022 मध्ये जळगांव जिल्हयातुन पुढील 1 वर्षासाठी हृददपार करण्याचा आदेश होवुनही सदरचा हृददपार इसम हा भडगांव शहरात येत असल्याचे बातमी मिळाल्याने, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ विलास पाटील, पो.कॉ स्वप्नील चव्हाण, पो.कॉ संदिप सोनवणे यांनी सदर इसमाचा वाक गावामध्ये शोध घेतला असता, तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब, पाचोरा उपविभाग यांच्या हृददपार आदेशाचे उल्लंघन केले, म्हणुन पोकॉ स्वप्नील चव्हाण यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून आज दि.19/5/2023 रोजी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शना खाली भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेखर डोमाळे, पो.हे.कॉ.विलास बाबुराव पाटील, पोकॉ.स्वप्नील चव्हाण, पोकॉ. संदिप सोनवणे यांनी शिताफिने केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ.संजय पाटील,भडगांव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button