खान्देश
साईनाथ वाचनालयात महात्मा पदवी दिन साजरा!

साईनाथ वाचनालयात महात्मा पदवी दिन साजरा !
खडकदेवळा बु.(प्रतिनिधी)- येथे साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा महात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्व प्रथम ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दिपप्रज्वलन व माल्यार्पण, कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास सोसायटी मा. चेअरमन श्री. तुषार सिनकर, ग्रा.पं. सदस्य दिनकर साठे, अभिमन शिंदे, वाचनालयाचे विश्वास पाटील, देवचंद गायकवाड, फॉऊंडेंशन चे संजय निकम, डॉ. यशवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थितांना महात्मा दिनाविषयीचे महत्व डॉ. यशवंत पाटील यांनी समजावून सांगताना म्हटले की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या सामाजिक, क्षैक्षणिक, कार्य तसेच तळागाळातील लोकांसाठी केलेले कार्य, महाराष्ट्रातील मुलींसाठी सर्व प्रथम शाळा सुरू करणे, समाज सुधारणेचे काम, दलितांना स्वतंत्र शाळा, पिण्याच्या पाण्याची सोय, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा दिला, विधवा, अनाथ मुलांना आधार, गरिबांना सावकाराच्या जाचातून मुक्तता करणे, सत्याचे नियम सांगणे, कर्म कांड,रूढी परंपरा,अज्ञानता, व अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रबोधन करणे, या सारख्या केलेल्या महान कामांचा कृतज्ञता सोहळा म्हणून सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे, रावबहादूर वंडेकर यांनी पुढाकार घेऊन दामोदर सावळाराम यंदे, तेलगू नेते स्वामी रामय्या, व्यंकय्या अय्यावारू, विठ्ठल वाळवेकर , यांनी मुंबईत कोळी वाडा येथे ११ मे १८८८ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी लोकांनी दिली असे ते शेवटी म्हणाले. ११ मे २०२३ ला या घटनेस १३५ वर्ष पूर्ण झाली आहेत कृतज्ञता पर्व म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना वाचनालयात आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वनाथ सिनकर, राजेंद्र निकम, योगिराज देवरे, रविंद्र निकम, रतन शिंपी, गजानन देवरे, दत्तू शिंपी,नितीन सुर्यवंशी, निलेश निकम, गणेश खराटे, बलराम देवरे, सचिन भील, हृतिक सुर्यवंशी, जगदीश पाटील, सुनिल सिनकर, राजू कोळी, इ. नवीन परीश्रम घेतले.



