गरिबीच्या परिस्थितीवर मात करत म्हसासच्या प्रमोद पाटील ने गाठले यश्याचे शिखर!

गरिबीच्या परिस्थितीवर मात करत म्हसासच्या प्रमोद पाटील ने गाठले यश्याचे शिखर.
भारत पाटील म्हसास (प्रतिनिधी) – तालुक्यातील म्हसास हे अत्यंत कमी म्हणजेच २००० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये इयत्ता दहावी पर्यंत शिक्षणाची सुविधा असल्याने पुढील शिक्षणाचा प्रवास बाहेर गावी करून अनेक विद्यार्थी पदवीधर होऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे,यातच प्रमोद भारत पाटील हा विद्यार्थी तरुणांचा प्रेरणास्थान ठरेल यात शंका नाही ,आई -वडीलाकडे एक एकर शेती ,मोल-मजूरी करून आईवडील संसाराचा गाडा ओढत असतात,त्यातच प्रमोद सुद्धा हातभार लावत असे, आईवडीलाचे कष्ट वाया जाऊ नये, म्हणून सलग पाच ते सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षाची तयारी करत होता, परंतु अपयश येत होते, अपयशाला खचुन न जाता जिद्द व परीश्रमाच्या जोरावर अखेर प्रमोद ला रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात यश प्राप्त झाले, तसेच त्याला वारंवार मार्गदर्शन तुषार पाटील डि.वाय.एस.पी मुंबई, महेंद्र वाघमारे , अमोल देशमुख यांचे सहकार्य लाभले, प्रमोद च्या यशाबद्दल गावातील ग्रामस्थ व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले,



