खान्देश

जळके येथील बालकांच्या आरोग्याच्या तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळके येथील बालकांच्या आरोग्याच्या तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी: जळके ता.जळगाव येथे जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश जगन्नाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी विठ्ठलमंदीरात जळगाव येथील तारांगण हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील यांच्या मार्फत जळके तसेच परिसरातील गावांतील लहान बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी एकुण १८३ बालकांची नोंद करून बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना गोळ्या -औषधे देण्यात आली , याठिकाणी तीन बालकांना त्वचेसंबधी समस्या असल्याचे आढळले त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
या तपासणी शिबिराला डॉ.राहुल पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी अमोल पाटील, गोपाल दांडगे व औषध विभागासाठी राहुल महाजन,सागर पाटील यांचा सहभाग होता तर त्यांना गावातील डॉ.प्रकाश परदेशी, डॉ.दिपक पाटील, डॉ.प्रशांत पाटील यांनी सहकार्य केले .
बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तथा ह.भ.प.रामचंद्र महाराज, सुभाष आण्णा पाटील, धनराज पाटील, सुभाष मकासरे,उत्तम पाटील (मॅनेजर दादा), प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, सुभाष पाटील सर, संजय पाटील सर,बापु पाटील यांची उपस्थिती होती.हे बालकांचे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी बबलू जाधव, संदिप पाटील,किरण पाटील, ईश्वर चिमणकारे, अमोल पाटील व धनराज पाटील यांचं अनमोल सहकार्य लाभले . या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजक जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश आप्पा पाटील यांनी समाधान व्यक्त केले तसेच डॉ.राहुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button