क्राईम

मोटारसायकल चोरी प्रकरणी आरोपीला नांदगांव येथुन भडगांव पोलिसांनी शिताफिने केली अटक !

मोटारसायकल चोरी प्रकरणी आरोपीला नांदगांव येथुन भडगांव पोलिसांनी शिताफिने केली अटक 

पाचोरा (प्रतिनिधी)-  पाचोरा – भडगाव तालुक्यासह शहरातुन मोटार सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन गेल्या एका वर्षात अनेकांच्या मोटार सायकल चोरीला गेल्याच्या अनेक घटना शहरासह पाचोरा भडगाव तालुक्यात घडल्या असुन याचा तंतोतत छडा भडगांव पोलिस लावत असुन मुद्देमाल ही हस्तगत करून आरोपींना करण्यात अटक करण्यात आली आहे.
                   याबाबत सविस्तर वृत्त असे की फ्रेबुवारी महिन्यात शहरातुन होंडा शाइन व बजाज प्लॅटिना अशा दोन मोटार सायकल चोरी गेल्याची घटना घडली होती याबाबत भडगाव पोलीस स्टेशन गु.र.न. ८९/ २०२३ भादवि कलम ३७९ गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर आरोपी नामे प्रकाश बागुल रा. वरखेडा ता.चाळीसगाव ह.मु. येवला रोड, नांदगाव ता.नांदगाव जि.नाशिक याचे बाबत गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने आरोपीची माहिती प्राप्त करुन त्याचा शोध घेऊन आरोपीस चे नांदगाव येथे जाऊन सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन भडगाव पोलीस स्टेशनमध्ये आणुन आरोपी कडे गुन्ह्याबाबत विचार पुस केली आरोपी ने सदर गुन्ह्याची कबुली देवुन सदर आरोपी कडुन दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे.  गाड्यांचे वर्णन पुढील प्रमाणे 1) होण्डा शाईन कंपनी ची मोटारसायकल क्र. MH 41, BB 039 तसेच 2) बजाज प्लँटीना काळ्या रंगाची मोटरसायकल क्र. MH 19 DJ 0373 अशा आरोपी कडुन जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा मा.अपर पोलीस अधीक्षक सो रमेश चोपडे सो. चाळीसगाव परिमंडळ, मा. सहा.पोलीस अधीक्षक सो. अभयसिह देशमुख चाळीसगाव उपविभाग, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील भडगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन खाली पोहेकाँ सचिन वाबळे हे करीत असून सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध मोहीम मध्ये पोहेकाँ सचिन वाबळे, पोहेकाँ विजय जाधव, पोकाँ सुनिल राजपूत, पोकाँ प्रविण परदेशी यांनी केली आहे. तसेच तांत्रिक मदतनीस पो.काँ ईश्वर पाटील स्था.गु.शा. जळगाव यांनी मदत केली आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button