खान्देश

मोटार सायकल चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.

मोटार सायकल चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.

जळगाव (प्रतिनिधी) – मोटार सायकल चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक करण्यात आली  डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक मोटार सायकल चोरी होत आहेत. सदर बाबत गोपनीय माहिती काढून पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले त्याअनुषंगाने  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की, वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदार सह मोटार सायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी सर्व नेम. स्था.गु.शा जळगाव अशांचे पथक तयार करून तात्काळ जाबीर शहा याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

त्यावरून नमुद पथक हे साधारण ३ दिवसापासून जाबीर शहा याचेवर पाळत ठेवून असतांना आज दिनांक २८/०८/२०२४ रोजी वरणगाव शहरातील तिरंगा चौकातून ताब्यात घेवून त्याचे कडून १) मुक्ताईनगर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क. ३७९ मधील हिरो कंपनीची HF डिलक्स RTO NO MH१९DJ७४१२, २) मलकापुर शहर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २९२/२०२४ भादंवि क.३७९ मधिल होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा पांढऱ्या रंगाची RTO NO.MH२८AX११४१, ३) मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्ह्यातील खकनार पो.स्टे गु.र.नं. ५१८/२०२४ भा.न्या.सं.३०३(२) मधिल रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट लाल व काळया रंगाची RTO NO.MP६८MG९६३८, ४) होन्डा कंपनीची युनिकॉर्न ग्रे रंगाची RTO NO.MH१२QB०३२७ अश्या एकुण १,५५,०००/- रु. किं. च्या ४ मोटार सायकल जप्त करून पुढील योग्य त्या कारवाई करीता मुक्ताईनगर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क.३७९ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button