खान्देश

पाचोरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘रूट मार्च’

पाचोरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘रूट मार्च’

पाचोरा, (बातमीदार) – गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडावेत, यासाठी पाचोरा पोलिसांकडून आज शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले.

पाचोरा शहरातील मुख्य मार्ग, आठवडे बाजार, बाहेरपुरा, सोनार गल्ली, गांधी चौक, रेल्वे स्टेशन रोड अशा प्रमुख भागांतून हे पथसंचलन झाले. शिस्तबद्ध पद्धतीने आणि पोलिस पथकाच्या निनादात पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी संचलनात सहभाग घेतला.

या रूट मार्चला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. रस्त्याच्या कडेला उभे राहून अनेकांनी पोलिसांचे स्वागत केले. यामुळे सणांच्या काळात, विशेषतः मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान शांतता आणि सुरक्षितता राखली जाईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

यावेळी पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी संजय निकम, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे (पाटील), कैलास ठाकूर,  सुनील पाटील,  कृष्ण घायाळ तसेच इतर कर्मचारी, गुन्हे शाखा पथक आणि होमगार्ड सहभागी झाले होते.

पोलिसांनी नागरिकांना सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button