खान्देश

ग्लॅम अँड ब्युटी स्पा’चे वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते उदघाटन !

ग्लॅम अँड ब्युटी स्पा’चे वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते उदघाटन

भडगाव, दिनांक ८ (प्रतिनिधी ) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अतिशय अद्ययावत सुविधांनी युक्त असणार्‍या ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ या ब्युटी शॉपीचे शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी असणार्‍या आदिती ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ या ब्युटी शॉपचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शॉपच्या संचालिका दीपा सुर्यवंशी आणि संगीता जाधव यांच्या वतीने वैशालीताई यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, ब्युटी सलून हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. विशेष करून कोरोनाच्या काळात याचे महत्व हे सर्वांनी अनुभवले आहे. शरीराला मेंटेनन्स करण्याची आवश्यकता असते. याचा विचार करता पार्लर हे गरजेची बाब होय. ‘ग्लॅम अँड ब्युटी स्पा’ हे अतिशय सुंदर असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. तर माऊली फाऊंडेशनच्या माध्यमातून या कुटुंबाने घेतलेले व्रत हे देखील अतिशय उत्तम असल्याचे वैशालीताई म्हणाल्या.

या कार्यक्रमाला योजना ताई पाटील, पुष्पाताई परदेसी, मीना बाग, रीना पाटील, सह सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button