खान्देश

गिरणा तापी जनविकास पर्यावरण संस्थेतर्फे पाचोरा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा!

गिरणा तापी जनविकास पर्यावरण संस्थेतर्फे पाचोरा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा!

पाचोरा (प्रतिनिधी)- येथे गिरणा तापी जनविकास पर्यावरण संस्था पाचोरा – भडगाव संस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने गणेश कॉलनी येथे संस्थेच्या अध्यक्ष उज्वला महाजन, शीला पाटील, संगीता नवगिरे, संगीता प्रजापत, अनघा नवगिरे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर हुतात्मा स्मारक येथे संस्थेतर्फे पर्यावरण जनजागृती सभा घेण्यात आली . सभेच्या अध्यक्षस्थानी उज्वला महाजन ह्या होत्या प्रास्ताविक आनंद नवगिरे यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणात उज्वला महाजन म्हणाल्या मनुष्याने मनाची सुंदरता जशी जपली पाहिजे  तशीच  पर्यावरणाची सुंदरता जपली पाहिजे. शीला पाटील यांनी प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे . नागरिकांनी प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिवापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन केले.  प्राध्यापक प्रीती सावंत (अकोला)  यांनी स्मार्ट सिटी मुळे शहरात होणाऱ्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याच्या थेंब अन थेंब  जमिनीतून मुरत नाही त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा ही काळाची गरज आहे असे सांगितले. तर पुढे क्षमा शर्मा म्हणाल्या जल है तो कल है प्लास्टिक जल को और कल को खत्म करता है!  इसलिये समाज मे बदलाव की अपेक्षा है ! डॉक्टर संजय माळी म्हणाले मानव हा पर्यावरणावर अवलंबून आहे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे वाढते तापमान आणि वृक्षतोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे.  त्यामुळे जंगलाचे रक्षण होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यतीन मोदी यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक महाजन यांनी केले. प्रसंगी पाचोरा येथील विविध शाळेतील कराटे मध्ये ब्लेक बेल्ट , व विविध मेडल मिळवविणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार हि करण्यात आला प्रसंगी  कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक नेते प्राचार्य डी एफ पाटील,  प्राध्यापक एल बी शर्मा , आर पी बागुल,  डी बी पाटील, कैलास अहिरे, राजेश धनराळे, कृष्णा पाटील, डॉक्टर भरतकुमार प्रजापत, शेख खलील सर, पत्रकार सुरेश तांबे, पत्रकार डॉक्टर योगेश पाटील, अशोक मोरे ,एकनाथ सदाशिव, शेख जावेद ,महावीर अग्रवाल, श्याम ढवळे ,गजानन पाटील, लता शर्मा ,ॲड मनीषा पवार, संगीता नवगिरे, संगीता प्रजापत, अनघा नवगिरे, दुर्गा मोरे, निना राजपूत, संगीता नेवे, अँड ललिता पाटील ,राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button