राजकीय

आ. नितेश राणे यांनी तृतीयपंथी यांचेबद्दल केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निषेध

आ. नितेश राणे यांनी तृतीयपंथी यांचेबद्दल केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निषेध

– पाचोरा पोलिस प्रशासनास दिले निवेदन…

पाचोरा (प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्षाचे आ. नितेष राणे यांनी तृतीयपंथी यांचेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने पाचोऱ्यात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे १४ जुलै रोजी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, जिल्हा उपाध्यक्षा संजीवनी रत्नपारखी, जिल्हा सदस्य कांताबाई कदम, वंचित बहुजन आघाडीचे मा. तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, तालुका सचिव सुनिल कदम, समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, संतोष कदम, आशा ब्राम्हणे, लता सपकाळे, वैशाली सोनवणे, प्रियंका ब्राम्हणे, दिलीप बागुल, किरण निकम, शांताराम खैरनार उपस्थित होते.

भाजपाचे आ. नितेष राणे हे सातत्याने समाजात धर्म, जात, व लिंग, आधारित वक्तव्य करतात, समुह – समुह, जाती – जातीत द्वेष व तेढ निर्माण करतात. त्याचाच एक भाग म्हणून नितेष राणे यांनी तृतीयपंथींबद्दल अपमान जनक वक्तव्य हे विकृतीचा भाग नसुन प्रकृती झाली आहे. अशी प्रकृती समाजात लिंग, धर्म व जातीचे नावाने द्वेष व तेढ निर्माण करते. मा. सर्वोच्च न्यायालयाने अशी प्रकृती रोखण्यासाठी तात्काळ गुन्हे नोंदवा असे निर्देशित केले आहे. भाजपा आ. नितेष राणे यांच्या बेताल व अपमान जनक वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच वंचित बहुजन महिला व युवा आघाडीच्या सदस्या शमीदा पाटील यांना पोलिसांनी दमदाटी व अपमान जनक वागणुक दिली त्याचे विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतो. अशा आषयाचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे पाचोरा पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी स्विकारले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button