महाराष्ट्र

अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या : सूत्र

अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या : सूत्र

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार केंद्र बिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. त्यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे.

शरद पवारांच्या मनात काय?

मात्र यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. म्हणूनच, अजित पवार यांच्यासोबतच शरद पवारांच्याही मनात नेमकं काय आहे, याबाबत आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा : अजित पवार

दरम्यान नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली नाही, आम्हीच मुंबईत आलो : अण्णा बनसोडे

दरम्यान, अजित पवार हे विधीमंडळातील आपल्या कार्यलयात पोहोचले आहेत. इथे ते गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच अनेक आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळातच ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली नसून आम्ही आमदारच एकत्र भेटणार आहोत, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. तसंच दादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल, असंही बनसोडे यांनी सांगितलं.

जयंत पाटील काय म्हणाले?

याबाबत एबीपी माझाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.
[11:29 AM, 4/18/2023] +91 93734 24739: “माझ्याकडे पक्की माहिती आहे की…”, संजय राऊतांचा अजित पवारांबाबत दावा; म्हणाले, “आज सकाळी आम्ही…!”

मुंबई – संजय राऊत म्हणतात, “सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या पोटात सगळ्यात जास्त गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण…!”

खासदार संजय राऊत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांसह सरकारला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केली जात आहे. यासंदर्भात सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार जाहीरपणे आपला अजित पवारांना पाठिंबा असल्याचं सांगत असताना स्वत: अजित पवार किंवा शरद पवार यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडत नाहीयेत. त्यामुळे राज्यात सध्या कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात मोठा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून ते अजित पवारांसमवेत भाजपा-शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रानं दिलं आहे. या वृत्तावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“मविआतील तिन्ही घटकपक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भारतीय जनता पक्षाला वाटतेय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. २०२४पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्याचं त्यांचं कारस्थान आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असतील. २०-२५ आमदार जाणं म्हणजे पक्ष खिळखिळा होणं असं नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? आजही हा पक्ष शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. बातम्या येतात ४० फुटले, ५० फुटले. अशा बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत, त्या खोट्या आहेत. भाजपा या अफवा, वावड्या उठवतंय. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतंय. पण तसं काहीही होणार नाही”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या पोटात सगळ्यात जास्त गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य पुन्हा एकदा मविआमधूनच शिखरावर जाणार आहे. त्यांच्याविषयीच्या बातम्यांचा मविआच्या एकीवर काहीही परिणाम होणार नाही. आज सकाळी आम्ही सगळे एकमेकांशी बोललो आहोत. तुम्ही जे आकडे सांगतायत, ते कुठून येतात हे मला माहिती नाही. एकाच वृत्तपत्राकडे हे आकडे कुठून येतात माहिती नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button