खान्देशराजकीय

जळगाव जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या ग्रंथालयांना आमदार निधीतून कायद्याची पुस्तके देण्याची मागणी मान्य !

जळगाव जिल्ह्यातील सर्व वकील संघांच्या ग्रंथालयांना आमदार निधीतून कायद्याची पुस्तके देण्याची मागणी मान्य .

पाचोरा (प्रतिनिधी)  – आमदार सत्यजित तांबे साहेब यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व मुख्य वकील संघाच्या ग्रंथालयांना आमदार निधीतून 50 हजार रुपये किमतीचे कायद्याची पुस्तके देणार असल्याची मागणी मान्य केली असून नुकतेच त्यांनी जळगाव जिल्ह्यात दौऱ्याप्रसंगी याबाबत आश्वासित केले. सदर पुस्तके हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व वकील संघांच्या ग्रंथालयांना पोहोचते केले जाणार असून ,सदर पुस्तके जिल्ह्यातील सर्व मुख्य वकील संघांना देण्यात यावी याबाबतची मागणी ॲड .अंबादास गोसावी यांनी मागणी लावून धरली होती.

यासंदर्भात वकील संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भडगाव येथे भेट घेतली असता भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड .बी. आर. पाटील भडगाव वकील संघाचे सचिव ॲड .भरत ठाकरे ॲड .निलेश तिवारी उपस्थित होते. याबाबत जिल्ह्यातील सर्व वकील संघाच्या अध्यक्ष व सचिव यांनी ॲड .अंबादास गोसावी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

यापूर्वी दिली आहेत वकील संघांच्या लायब्ररी साठी पुस्तके तसेच संगणक. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची परंपरा आमदार सत्यजीत तांबे पुढे चालवत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व वकील एकसंघपणे तांबेंच्या पाठीशी उभे असतात.

आमदार तांबे घेतायेत कायद्याचे धडे.
उच्चशिक्षित, अभ्यासू व अत्यंत विनम्र म्हणून ओळखले जाणारे आमदार सत्यजीत तांबे हे सध्या कायद्याचे शिक्षण घेत आहेत. मुंबई विद्यापीठातून शासकीय महाविद्यालयात लॉचे शिक्षण घेत आहेत.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button