भडगाव येथे शक्ती कायदा अंमलबजावणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सह्यांची मोहीम…!

भडगाव येथे शक्ती कायदा अंमलबजावणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सह्यांची मोहीम…!
भडगांव (प्रतिनिधी) : भडगांव येथे उद्धव सेनेच्या वतीने महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध निषेध करण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेत मंजुर केलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणीसाठी शिवसेना, युवा सेना, युवती सेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सह सर्व महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांच्या सक्षमीकरण व बळकटी साठी शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. सदर प्रसंगी उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, तालुका प्रमुख जे. के. पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, महीला पदाधिकारी योजना पाटील, पुष्पा पाटील, गायत्री पाटील, उषा परदेशी, सुरेखा वाघ, निता भांडारकर, मनीषा पाटील, कल्पना पाटील, कविता बाविस्कर, बेबाबाई पाटील, वैशाली पाटील, शितल पाटील, सुवर्णा महाजन, सरला भोई, कविता निकम, लक्ष्मीबाई मिस्तरी, दिपाली ओतारी, आशा राजपूत, साधना पाटील आदी असंख्य महिला युवतींसह युवासेनेचे चेतन पाटील, माधव जगताप, चेतन पाटील, यश बिरारी, नवल राजपूत, सत्यजित पाटील, रितेश महाजन, भावेश अहिरे, नरेंद्र राजपूत, सुशील महाजन, आकाश कुंभार, वाल्मीक धनगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



