खान्देश

जळगाव जिल्ह्यात पाचोरा अव्वल! BLO महेशराव चौधरी यांनी SIR विशेष पुनरीक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण केले

जळगाव जिल्ह्यात पाचोरा अव्वल! BLO महेशराव चौधरी यांनी SIR विशेष पुनरीक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण केले

पाचोरा | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या Special Intensive Revision (SIR) – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) श्री. महेशराव शेवराम चौधरी यांनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या मतदान यादी भाग क्रमांक १२८ चे SIR चे काम १०० टक्के पूर्ण करून जळगाव जिल्ह्यात प्रथम होण्याचा मान मिळविला आहे.

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा श्री. भूषण अहिरे यांच्या नियंत्रणाखाली पाचोरा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरभेटी देऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळत असून, Enumeration Form (EF) चे वितरण, संकलन आणि भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मोबाईल अॅपवर माहितीचे डिजिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात एकूण ३४५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असून, सर्व अधिकारी नियोजित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

होल (ता. पाचोरा) येथील मतदान यादी भाग क्रमांक १२८ चे BLO श्री. महेशराव शेवराम चौधरी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण ८८९ मतदारांपैकी ८८१ मतदारांना Enumeration Form वितरित करून त्याचे डिजिटायझेशन पूर्ण केले, तर ८ मतदारांची ‘Uncollectible’ म्हणून नोंद केली. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले SIR चे काम १०० टक्के पूर्ण करून जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम काम पूर्ण करणारे BLO म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे यांनी श्री. महेशराव चौधरी यांचे अभिनंदन करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन इतर सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनीही विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम अचूक, गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत नागरिकांनीही आपल्या संबंधित BLO यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

दिनांक : ०९ जुलै २०२६
स्थळ : पाचोरा

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button