भाजपा नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांची नाचनखेडा येथील रामतीर बाबा यात्रा उत्सवात उपस्थिती…!

भाजपा नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांची नाचनखेडा येथील रामतीर बाबा यात्रा उत्सवात उपस्थिती…!
नाचणखेडा (ता. पाचोरा):
श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या जल्लोषात साजऱ्या झालेल्या रामतीर बाबा यात्रा उत्सवाला भाजपा नेत्या मा. वैशालीताई सूर्यवंशी यांनी भेट देऊन दर्शन घेतले. त्यांच्या आगमनावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात मा. वैशालीताई सुर्यवंशी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांकडून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहारांनी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी हिम्मत आण्णा, करण नाना, धर्मेंद्र निकुंभ, गौतम घोडेस्वार, गुलाब निकुंभ, दिपक महाले, विठ्ठल निकुंभ यांच्यासह ग्रामस्थ मंडळी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



