खान्देश

पाचोरा  दिवाणी न्यायालयात न्यायाधीश औंधकर यांची बढती तर बदली मुले निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न !

पाचोरा  दिवाणी न्यायालयात न्यायाधीश औंधकर यांची बढती तर बदली मुले निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न !

पाचोरा: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात नुकतेच दिवाणी न्यायाधीश जी.बी. औंधकर यांची बढती व बदली झाल्याने त्यांचा  निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश एस.व्ही. निमसे हे होते.

याप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश जी.एस. बोरा, सरकारी अभियोक्ता हटकर मॅडम, मिलिंद येवले, मीना सोनवणे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी व वकील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित कर्मचाऱ्यांनी मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर यांचे औक्षण व तिलक करून स्वागत केले. त्यानंतर मा. औंधकर यांचा त्यांच्या पत्नीसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मा. न्यायाधीश निमसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या निरोप समारंभाच्या वेळी कु. दक्षता पाटील, दीपक पाटील, स्वप्निल पाटील, रवींद्र पाटील, उमेश महाजन, संदीप जगताप, चंद्रकांत नाईक, अमित दायमा, उल्हास महाजन, सरकारी वकील मिलिंद येवले, सौ. औंधकर मॅडम तसेच मा. न्यायाधीश बोरा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी न्यायाधीश औंधकर यांच्या कामाच्या पद्धतीचे, मार्गदर्शनाचे आणि सहकार्याच्या वृत्तीचे कौतुक केले.

आपला सत्कार स्वीकारल्यानंतर मा. न्यायाधीश औंधकर भावुक झाले आणि त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपण सर्वांनी मिळून दिलेला हा निरोप समारंभ माझ्यासाठी एक अमूल्य भेट आहे. मला या ठिकाणी सर्वांचे खूप प्रेम मिळाले. मी श्री. निमसे साहेब, बोरा मॅडम तसेच न्यायालय कुटुंबातील सर्व सदस्यांचा आभारी आहे. तुमच्या सर्वांच्या आठवणी माझ्या मनात कायम घर करून राहतील.”

अध्यक्षीय भाषणात मा. न्यायाधीश निमसे यांनी न्यायमूर्ती औंधकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ” मा. औंधकर सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारे, चांगली शिकवण देणारे, उत्तम मार्गदर्शन करणारे आणि सकारात्मक विचारांचे व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक अडचणीमध्ये ते नेहमी खंबीरपणे आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. आपल्याला असे साहेब लाभले हे आपले भाग्य आहे.” अशा गौरवपूर्ण शब्दांत त्यांनी न्यायमूर्ती औंधकर यांच्या कार्याचा उल्लेख केला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अभिजित दायमा यांनी केले तर आभार प्रदर्शन चारुशीला पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा. अधीक्षक नितीन मोरे, संदीप भोंडे, किशोर अत्रे, पोलीस कर्मचारी आबा पाटील, विकास सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, दीपक पाटील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button