खान्देश

पाचोरेकरांसाठी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत जलसेवा टँकर पुजन करून शुभारंभ : पाणी टंचाईचे होणार निराकरण

पाचोरेकरांसाठी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत जलसेवा
टँकर पुजन करून शुभारंभ : पाणी टंचाईचे होणार निराकरण

पाचोरा, दिनांक १० (प्रतिनिधी ) : शहरातील अनेक भागातील नागरिकांची पाण्याची समस्या लक्षात घेता शिवसेना-ुउध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने आजपासून मोफत जलसेवा सुरू करण्यात आली आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाचोरा शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे. या अनुषंगाने नागरिकांना टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा व्हावा या हेतूने वैशालीताई सुर्यवंशी यांनी आजपासून सेवा सुरू केली आहे. त्यांनी टँकरचे पूजन करून रवाना केले.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, मोफत जलसेवेचे पहिले टँकर हे शहरी भागासाठी असले तरी ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन याला खेडोपाडी देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जलसेवा ही मानवतावादी सेवा असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मदत होणार आहे.

दरम्यान, टँकर पुजनाच्या प्रसंगी अनिल सावंत शहर प्रमुख भरत खंडेलवाल राजूभाऊ काळे आणि त्यांचे सर्व सहकारी दादाभाऊ चौधरी संदीप जैन नामदेव चौधरी खंडू मनोज चौधरी सोनवणे अशोक पाटील अभिषेक खंडेलवाल पप्पू जाधव समस्त कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button