खान्देश

कोळगांवचा अभिमान! कैलास माधवराव महाजन यांचा “आंतरराष्ट्रीय एकता दिवस” परेडमध्ये गौरवशाली सहभाग

कोळगांवचा अभिमान! कैलास माधवराव महाजन यांचा “आंतरराष्ट्रीय एकता दिवस” परेडमध्ये गौरवशाली सहभाग

 

भडगांव तालुक्यातील कोळगांव या छोट्या पण तेजस्वी गावाने पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्ववान पुत्रामुळे देशभरात आपली छाप उमटवली आहे.

कै. माधवराव चिंतामण पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री कैलास माधवराव महाजन यांनी गुजरातमधील केवडिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सशस्त्र सीमा बल (SSB) च्या तुकडीसोबत परेड सादर करून गावाचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.

या अभिमानास्पद यशामुळे कोळगांव ग्रामस्थांमध्ये तसेच भडगांव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, श्री कैलास महाजन हे श्री समाधान माधवराव महाजन — मुख्याध्यापक, सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळा, पाचोरा — यांचे मोठे बंधू आहेत. दोन्ही भावंडांच्या या कर्तृत्वामुळे महाजन परिवारासह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button