
भडगाव तालुक्यातील शिंदी येथील ग्रामस्थांचा कॉंग्रेस प्रवेश
भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिंदी येथील सामाजिक कार्यकर्ते यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे.
शिंदी गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली युवक तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदी येथील विलास उत्तम पाटील, कैलास भगवान पाटील, युवराज रामलाल पाटील, संजय रघुनाथ पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी विलास उत्तम पाटील यांना सेवादल तालुका अध्यक्ष पद देऊन काँग्रेस पक्षाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी .प्रदीप पवार यांनी दिली . भडगाव काँग्रेस कमिटी कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले
कार्यक्रमात सेवादलाचे जिल्हाध्यक्ष संजय बळीराम पाटील, तालुका अध्यक्ष रतिलाल महाजन युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष कमर आली, संजय पाटील, अतुल पाटील, हरुण पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



