खान्देश

 लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा येथे भव्य वारकरी बालसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न !

 लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा येथे भव्य वारकरी बालसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न !

         

पाचोरा (डॉ.योगेश पाटील) –  शहरातील जारगाव चौफुली व्यंकट गोपाल मंगल कार्यालय येथे  लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा तर्फे घेण्यात आलेल्या सात दिवशीय  भव्य वारकरी बालसंस्कार शिबिराच्या समारोप संपन्न झाला . प्रसंगी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ज्येष्ठ वारकऱ्यांचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  गेल्या सात दिवसापासून भव्य आणि दिव्य असे वारकरी बालसंस्कार शिबिर चालू होते.  शिबिरामध्ये पूर्ण खान्देशातून  जवळ जवळ २०० मुलांनी सहभाग घेतला आणि अतिशय शांततेत व संगीत व भक्तीमय वातावरणात  यशस्वीरित्या शिबिर पार पडले.  शिबिराच्या समारोपा प्रसंगी अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायासाठी प्रचारासाठी तळागाळात काम करणारे वारकरी , टाळकरी , विणेकरी , मुदुंगाचार्य , वारकरी संप्रदायातील जेष्ट मंडळी यांचा सन्मान करण्याचा मानस संस्थेने घेतला आणि तो उत्कृष्ट असा सन्मान सोहळा देखील या शेवटच्या दिवशी पार पडला . या  प्रसंगी शिबिरातील सहभागी  विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याला यशवंत महाराज अमळगावकर, श्याम महाराज पिंपळगावकर,  स्वप्निल महाराज गिरड, रवींद्र महाराज कारखेडकर,  आदी करून तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी उपस्थित होते . या कार्यक्रमाची धुरा म्हणजे याचे आयोजन ज्यांनी केले ते संत सेवक भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर
ह भ प सुनीताताई पाटील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा यांच्या व विशेष उपस्थितीत पार पडला. वारकरी संप्रदायाची पताका अशीच फडकवत तेवत ठेवण्याचा व असेच वारकरी बालसंस्कार शिबीर घेण्याचा मानस देखील योगेश महाराज धामणगावकर यांनी न्यूज झेप इंडियाशी बोलतांना व्यक्त केला व या कार्यक्रमासाठी जागेपासून , ते अन्न दानाची , पाण्याची , मंडपाची व ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार देखील त्यांनी यावेळी मानले .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button