“मराठा सेवा संघाचे ३३ वा वर्धापन दिनानिमित्त सु-संवाद कार्यक्रम”

“मराठा सेवा संघाचे ३३ वा वर्धापन दिनानिमित्त सु-संवाद कार्यक्रम”
मराठा सेवा संघाची स्थापना दि. १ सप्टेंबर १९९० रोजी झाली असून ३३ वर्ष पूर्ण झालेत. या वर्धापन दिनानिमित्त सु-संवाद साधण्यासाठी रविवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता कर्जत-जामखेडचे आमदार शिवश्री रोहीत पवार व राज्याचे माजी गृहमंत्री स्मृतिशेष आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव शिवश्री रोहीत पाटील येत आहेत.
वर्धापन दिनानिमित्त आयोजीत सु-संवाद कार्यक्रम “जिजाऊ भवन, निवृत्ती नगर, केरळी मंदिरा जवळ, जळगाव” येथे साजरा होत आहे. तरी या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे ३३ कक्षाचे सर्व पदाधिकारी, सभासद व समाज बांधवांनी वेळेवर हजर राहून सहभाग नोंदवावा असे विनंती वजा आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .
निमंत्रक :-
जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व ३३ कक्ष मराठा सेवा संघ जळगाव जिल्हा.



