खान्देश

 पहान–लाख रस्त्याला अखेर न्याय; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या थेट हस्तक्षेपामुळे कामास तात्काळ सुरुवात

 पहान–लाख रस्त्याला अखेर न्याय; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या थेट हस्तक्षेपामुळे कामास तात्काळ सुरुवात

पाचोरा (प्रतिनिधी ) – पहान–लाख रस्त्याची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली समस्या अखेर मार्गी लागली असून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

रस्ता अत्यंत खराब असल्याने मोठी वाहने जाणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले असतानाही आमदार पाटील यांनी कोणतीही सबब न स्वीकारता स्वतः मोटरसायकलवरून शेतकऱ्यांसोबत चार किलोमीटर अंतर पार करत धरणाची पाहणी केली. जनतेच्या अडचणी प्रत्यक्ष अनुभवून सोडवणारे नेतृत्व म्हणून त्यांनी पुन्हा एकदा विश्वास संपादन केला.

ठरलेल्या दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी हजर राहून त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना काम त्वरित सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले. कोणताही अडथळा निर्माण झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यानंतर पहान–लाख रस्त्याचे भूमिपूजन करून कामास अधिकृत सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद तावडे, उपनगराध्यक्ष किशोर बावरकर, कृषी बाजार समितीचे सभापती गणेश बापू यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, पहान गावातील सिंचन पाण्याच्या प्रश्नावरही आमदार पाटील यांनी तत्काळ दखल घेत धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. फॉरेस्ट क्षेत्रातील या धरणातून गावासाठी पाणी उपलब्ध करण्याबाबत जागेवरच चर्चा करून उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यात आली.

“हा प्रश्न मी वैयक्तिक लक्ष घालून सोडवणार असून पहानवासीयांना निश्चित न्याय मिळेल,” असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

रस्त्यावर उतरून समस्या समजून घेणे, त्वरित निर्णय आणि कामाला गती देणे हीच आमदार किशोर आप्पा पाटील यांची कार्यशैली असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. त्यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार करण्यात आला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button