खान्देश

*प्रा. सुवर्णा पाटील यांना पीएच. डी. पदवी प्रदान*

*प्रा. सुवर्णा पाटील यांना पीएच. डी. पदवी प्रदान*

*पाचोरा दि. 26 -* पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या प्रा. सुवर्णा राजेंद्र पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

प्रा. सुवर्णा पाटील या पो. हे. कॉ. श्री. राजेंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. तसेच त्यांचे पीएच. डी. चे मार्गदर्शक प्रा. डॉ. जयप्रकाश चौबे, साक्री (धुळे) येथील होते. त्यांचा शोधप्रबंधाचा विषय “पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्यावर नोकरीच्या संस्कृतीचा विश्लेषणात्मक अभ्यास” आहे.

सदर संशोधनातून त्यांनी पोलिसांच्या कामाच्या स्वरूपाचा त्यांच्या आरोग्य व कौटुंबिक जीवनावर होणारा परिणाम सखोलपणे मांडला असून भविष्यातील धोरणात्मक सुधारणा व संशोधनासाठी हे कार्य मार्गदर्शक ठरणार आहे.

या सत्कार समारंभाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. सुवर्णा पाटील यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक, सहकारी ,कुटुंबीय व महाविद्यालयाच्या सहकार्याला दिले. यावेळी त्यांना उपस्थितांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button