खान्देश

 पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली; नवीन पदाधिकारी मंडळ जाहीर

 पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली; नवीन पदाधिकारी मंडळ जाहीर

**पाचोरा, दि. १२ (प्रतिनिधी): – पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी प्रतिष्ठित डॉक्टरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.

या सभेला डॉ. अनिल झवर, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. भरत पाटील बापू, डॉ. नरेश गवंडे, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. मुकेश राठोड, डॉ. अतुल पाटील, डॉ. दिनेश सोनार, डॉ. जाकीर देशमुख, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील आदी मान्यवर डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेमध्ये सर्वांच्या संमतीने पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे **नवीन पदाधिकारी मंडळ २०२५-२६** निवडण्यात आले असून त्यामध्ये –

चेयरमॅन :** डॉ. जीवन पाटील
अध्यक्ष :** डॉ. अजयसिंग परदेशी
उपाध्यक्ष :** डॉ. विजय जाधव
सचिव :** डॉ. राहुल काटकर
सहसचिव :** डॉ. राहुल झेरवाल
खजिनदार :** डॉ. राहुल पाटवारी

सभेला पाचोरा व परिसरातील अनेक मान्यवर डॉक्टरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

नवीन पदाधिकारी मंडळाची निवड झाल्यानंतर माजी अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी गतवर्षीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. दिनेश सोनार, डॉ. अतुल पाटील व डॉ. अनिल झवर यांनीही असोसिएशनच्या उपक्रमांची प्रशंसा केली.

नवीन अध्यक्ष डॉ. अजयसिंग परदेशी यांनी आपल्या मनोगतात सर्व डॉक्टर बांधव-भगिनींच्या प्रगतीसाठी तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनतेच्या आरोग्यवर्धनासाठी निष्ठेने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभारही मानले.

सभेच्या शेवटी सर्व डॉक्टरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button