खान्देश

उद्योजक मनोज  शांताराम पाटील यांच्यातर्फे  अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानसाठी कार्यालय कॅबिन ऑफिसचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिसानिमित्त  प्रतिष्ठानासाठी लोकार्पण समाजविकासासाठी नव्या सुविधांची भर – सामाजिक एकतेस नवे बळ

उद्योजक मनोज  शांताराम पाटील यांच्यातर्फे  अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानसाठी कार्यालय कॅबिन ऑफिसचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिसानिमित्त  प्रतिष्ठानासाठी लोकार्पण समाजविकासासाठी नव्या सुविधांची भर – सामाजिक एकतेस नवे बळ

पाचोरा (प्रतिनिधी):
अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानच्या नवीन ऑफिस केबिनचे उद्योजक मनोज शांताराम पाटील यांच्या पुढाकाराने तसेच उद्योजक प्रदीप शांताराम पाटील व उद्योजक संजू  शांताराम पाटील यांच्या सहकार्याने पाचोरा येथील अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान मंगल कार्यालय, सारोळा रोड येथे नवीन ऑफिस केबिनचे उद्घाटन पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट किशोर पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

उद्घाटनावेळी आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, “मराठा समाजाची प्रगती ही एकतेतूनच साध्य होते. समाजातील सर्व घटकांनी या नव्या कार्यालयाचा उपयोग समाजसुधारणेसाठी, सामाजिक एकता आणि विकासासाठी करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

नवीन ऑफिस केबिन स्थापनेमुळे कार्यालयातील सुविधा अधिक वाढल्या असून समाजाच्या सर्व स्तरांवरील कार्याला नवी गती मिळणार आहे. विवाह, सामूहिक उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी ही सोय अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

या प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध नेतृत्वकर्त्यांनी उद्घाटनाचे स्वागत करत नव्या विकासकामांचा शुभारंभ झाल्याचे समाधान व्यक्त केले. नवीन कार्यालयाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या संघटनात्मक कार्यक्षमतेत वाढ होऊन पाचोरा-भडगाव परिसरातील एकता अधिक बळकट होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम, प्रगतीशील विचार आणि समाजहिताच्या नव्या दिशेचा आराखडा ठरविण्यात आला.
समाजसेवेच्या भावनेतून ही ऑफिस केबिन उद्योजक मनोज  शांताराम पाटील, उद्योजक प्रदीप  शांताराम पाटील व उद्योजक संजू  शांताराम पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजबांधवांना भेट म्हणून प्रदान केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील व
अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान, पाचोरा – पदाधिकारी मंडळ संस्थापक अध्यक्ष: डॉ. प्रा. योगेश रमेश पाटील उपाध्यक्ष: नितिन सुरेश पाटील सचिव: संजय आधार पाटील कार्याध्यक्ष: धनराज नारायण पाटील
सहसचिव: राहुल रामराव पाटील
खजिनदार: संभाजी गंगाधार पाटील सदस्य: सुरेश किसनराव पाटील, चिंतामन बाजीराव पाटील, संदीप विश्वास मराठे, किशोर काशीनाथ पाटील, आबाजी गोबा पाटील, दिलीप चूडामन पाटील, सुरेश आत्मारामयांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित पाटील, कुंदन रविंद्र पाटील, डॉ. प्रशांत नारायण पाटील, विकास रामराव पाटील, मनोज रामदास पाटील, सारंग अमृत पाटील, चंद्रकांत अशोक सोमवंशी, किरण पाटील, अधिकार पाटील. स्वीय सहाय्यक राजेश पाटील राजू बाबाजी नगराज पा सुनील पा सरपंच जारगाव प्रवीण पा स्वी स, आमदार यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button