पाचोरा तालुक्याची शान — कु. शर्वरी कुलकर्णी हिने विभागीय ज्युडो स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!

पाचोरा तालुक्याची शान — कु. शर्वरी कुलकर्णी हिने विभागीय ज्युडो स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!
*पाचोरा (प्रतिनिधी – डॉ. योगेश पाटील):*
धुळे येथे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या शालेय विभागीय ज्युडो स्पर्धेत पाचोरा येथील M. M. कॉलेज*ची विद्यार्थिनी तसेच *महावीर व्यायामशाळा व क्रीडा संस्था*ची महिला मल्ल **कु. शर्वरी कुलकर्णी* हिने ६३ किलो गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे शर्वरीने पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून पाचोऱ्याचा गौरव वाढविला आहे.
या यशामागे तिचे वस्ताद *दिनेश पाटील * यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तसेच *गिरीश पाटील सरांचे सहकार्य* लाभले.
विशेष म्हणजे, शर्वरीने याच वर्षी कुस्ती आणि ज्युडो या दोन्ही स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर पात्रता मिळवून दुहेरी यश मिळवले आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल
*प्राध्यापक शेख (पिंपळगाव हायस्कूल)*,
*प्राध्यापक सचिन वाघ (अमळनेर कॉलेज)*
आणि *महावीर व्यायामशाळेचे अध्यक्ष राजू दादा पाटील*
यांनी शर्वरीचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



