खान्देश

तापी जनविकास पर्यावरण संस्थे तर्फे गणेश मंडळाना ढाल वितरण सोहळा पाचोरा …

तापी जनविकास पर्यावरण संस्थे तर्फे गणेश मंडळाना ढाल वितरण सोहळा पाचोरा …

येथे गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था, पाचोरा भडगाव संस्थेतर्फे पर्यावरण रक्षण व संवर्धन, लोकसंख्या नियंत्रण, राष्ट्रीय एकात्मता, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, देहदान व अवयव दान या विषयांवर उत्कृष्ट आरास देखावे सादर केलेल्या गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरूपात ढाली देण्यात आल्यात.

पर्यावरण रक्षण व संवर्धन या विषया वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल पांचाळेश्वर गणेश मित्र मंडळ, कोंडवाडी गल्ली व जयहिंद क्रिडा व लेझीम मंडळ, कृष्णापूरी यांना दत्तात्रय बोरसे पाटील व शीला1- कृष्णा पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

लोकसंख्या नियंत्रण या विषयावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रा. रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल रंगारगल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व जय मल्हार गणेश मंडळ, देशमुखवाडी यांना आर. पी. बागुल व व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते देण्यात आली,

‘राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावरील शहिद भगतसिंग यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल जय मल्हार गणेश मंडळ, देशमुखवाडी यांना सौ. शीला पाटील, के. डी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

‘स्त्रीभ्रूण हत्या विरोध’ या विषयावरील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, गाडगेबाबा नगर यांना  उज्वला महाजन, अशोक महाजन यांच्या हस्ते देण्यात आली.

‘देहदान व अवयव दान’ या विषयावरील कॉम्रेड ज्योती बसू यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल पांचाळेश्वर मित्र मंडळ, कोंडवाडा गल्ली यांना प्राचार्य डी. एफ. पाटील, वृषाली चव्हाण, प्रा. गोकुळ चव्हाण (मुंबई) यांच्या हस्ते देण्यात आली.

‘राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावरील दुसज्या व तिसऱ्या क्रमांकाच्या ढाली लालबागचा राजा गणेश मंडळ व बालजी मित्र मंडळ यांना यतीन मोदी व कैलास अहिरे यांच्या हस्ते देण्यात आल्यात तर पर्यावरण रक्षण व संवर्धन’ या विषयावरील तिसऱ्या क्रमांकाची ढाल संगीता भरतकुमार प्रजापत यांच्या हस्ते श्री गणेश मित्र मंडळ बाहेरपुरा यांना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृषाली गोकुळ चव्हाण (मुंबई) या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद नवगिरे यांनी केले. या प्रसंगी गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष व्ही. टी. जोशी, शीला पाटील, उज्वला महाजन, विद्या कोतकर, प्रा. डॉ. सुनिता मांडोळे, नयना कापुरे यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उज्वला महाजन यांनी केले, तर आभार वर्षा राठोड यांनी मानले.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक प्राचार्य डी. एफ. पाटील. आर. पी. बागूल, अशोक महाजन, मुख्याध्यापक के. एन. शेख, डॉ. भरतकुमार प्रजापत, राजेश धनराळे, कैलास राठोड, दुर्गा मोरे, माला पंजाबी, दत्तात्रय बोरसे- पाटील, एस. एच. कोतकर, डॉ. योगेश पाटील (पत्रकार), अनिल आबा येवले (पत्रकार) खंडू सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ सदनरशीव, के. डी. पाटील, कैलास अहिरे, नाना महाजन, साथी, आदि यांनी परिश्रम घेतले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button