रयत सेनेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी भडगाव तालुक्यातील पेंडगाव चे सुपुत्र किरण महाराज पाटील यांची निवड
रयत सेनेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी भडगाव तालुक्यातील पेंडगाव चे सुपुत्र किरण महाराज पाटील यांची निवड
रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी नियूक्तीपत्र देवून केली निवड
चाळीसगाव प्रतिनिधी -भडगाव तालुक्यातील पेंडगाव चे सुपुत्र वारकरी साप्रदायात गायक म्हणून नावलौकिक असलेले किरण महाराज पाटील यांची रयत सेनेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी पेंडगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात दि ५ एप्रिल २०२३ रोजी रात्री ९ वाजता रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांनी नियूक्तीपत्र देवून निवड केल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात किरण महाराजांचे अभिनंदन केले याप्रसंगी जामनेर चे नगरसेवक धोंडू आप्पा पाटील, पैलवान शरद बाबुराव पाटील, रयत सेना प्रदेश कार्याध्यक्ष विजय (पप्पू ) पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे ,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते



