खान्देश

चंद्रकांत पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार !

चंद्रकांत पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार !

पाचोरा- तालुक्यातील खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत बाजीराव पाटील यांना नुकतेच महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सावंतवाडी-कोकण, जि – सिंधुदुर्ग येथील नगरपालिका नाट्यगृहात दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या विशेष समारंभात माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील सर यांना सपत्नीक गौरवण्यात आले. सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री.व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, जिल्हासचिव प्रवीण मोरे, गजेंद्र कानडे (दोंडाईचा) सौ. कुंदा पाटील, कृष्णराव पाटील, भावेश अहिरराव, राजेंद्र पाटील, स्वप्निल बागुल, प्रा.डॉ.गिरीश पाटील (नाशिक), सतीश संदानशिव, स्वाती पाटील, कुमुदिनी पाटील, श्रद्धा अहिरराव, ज्योती संदानशिव आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते. विश्वासराव पवार ट्रस्टचे अष्टपैलू शिक्षक चंद्रकांत पाटील सरांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button