प्रकाश तेली यांच्या ‘प्रकृति की महत्ता’ कविता संग्रहाचे भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन
प्रकाश तेली यांच्या ‘प्रकृति की महत्ता’ कविता संग्रहाचे भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव: लेखक आणि पत्रकार प्रकाश रामदास तेली यांच्या ‘प्रकृति की महत्ता’ या हिंदी कविता संग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते पुणे येथे झाले.
हे पुस्तक निसर्गाचे महत्त्व आणि मानवी जीवनावरील त्याचे परिणाम यावर आधारित आहे. प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्याचे कौतुक करताना भारत सासणे म्हणाले की, “अशा अभिनव आणि सामाजिक विषयांवरील पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवीत.”
‘प्रकृति की महत्ता’ची वैशिष्ट्ये
या कविता संग्रहातून निसर्ग मानवी जीवनासाठी किती आवश्यक आहे हे मांडण्यात आले आहे. निसर्ग आपल्याला जीवन आणि प्रेरणा दोन्ही देतो, कारण तेच आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. निसर्गाशिवाय चांगले अन्न आणि चांगले आरोग्य मिळणे अशक्य आहे.
पुस्तकात असेही नमूद केले आहे की, निसर्ग आपल्याला जे काही देतो, ते निर्माण करणे मानवाला शक्य नाही. यावरून निसर्गाच्या अद्भुत शक्तीची कल्पना येते. आज वाढते प्रदूषण आणि पर्यावरणातील बदलांमुळे मानवी जीवन विस्कळीत झाले आहे, आणि त्याचे मुख्य कारण निसर्गावरील मानवी आक्रमण आहे, यावर या संग्रहात भर देण्यात आला आहे.
या पुस्तकातून निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला आहे.



