शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक शेती यंत्रांचा महोत्सव,शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांची प्रभावी उपस्थिती!
शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक शेती यंत्रांचा महोत्सव,शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांची प्रभावी उपस्थिती!
भडगाव- प्रतीनीधी( संजय शेवाळे)-शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक शेती यंत्रांचा महोत्सव,शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रभावी उपस्थिती!
शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी, त्यांचा श्रम व वेळ वाचावा आणि उत्पादनक्षमता वाढावी या उदात्त हेतूने महेंद्र स्वामी एग्रीकल्चर मशिनरी आणि श्री साई एग्रीकल्चर मशिनरी यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अत्याधुनिक यंत्रांचा योग्य वापर, त्याचे दीर्घकालीन फायदे आणि शेतीतील बदलते तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. “शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार गरजेचा आहे; मेहनतीसोबत आधुनिकतेची जोडच शेतीला नवा आयाम देते”, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमात नव्या पिढीच्या अत्याधुनिक शेती यंत्रांचे वितरण देखील करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पाचोरा पंचायत समिती सदस्य डॉ. पी. एन. पाटील, योजनाताई पाटील, डी. डी. पाटील, हंटर कंपनीचे संचालक विशाल वाळेकर, अतुल प्रकाश चौधरी, करण दिलीप परदेशी, संजय गिरीधर सोमवंशी, विश्वनाथ सोमवंशी, शिवदास पाटील, संजय सोमवंशी, ऋषिकेश पाटील, नाना चव्हाण, गोरख पाटील, प्रदीप पाटील, अमोल मोरे, दिगंबर पाटील, बाळकृष्ण सोमवंशी, विजय पाटील, मुकेश बारकू पाटील, प्रवीण निकम,संतोष महाजन, विठ्ठल राजपूत, मंगेश ठाकरे यांचा समावेश होता.
श्री महेंद्र स्वामी एग्रीकल्चर मशिनरीचे संचालक सचिन बाळू मोरे व बाळू कृष्णा पाटील यांनी सर्व मान्यवरांचे व शेतकरी बांधवांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी केवळ यंत्रांची ओळख नव्हे, तर आधुनिक शेतीच्या नव्या युगाची सुरुवात ठरला.



