खान्देश

अमळनेर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण: महसूल दिनी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

अमळनेर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण: महसूल दिनी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

 

अमळनेर – आज, १ ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधून जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील अनेक महसूल कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरव करण्यात आला. यात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचे वाहन चालक ताराचंद महारू बाविस्कर यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट वाहन चालक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ताराचंद बाविस्कर यांच्यासोबतच अमळनेर येथील नायब तहसीलदार प्रशांत धमके, उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून अशोक ठाकरे, मंडळ अधिकारी संवर्गातून विठ्ठल पाटील, कोतवाल संवर्गातून मुकेश शिसोदे आणि नगाव येथील पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, आमदार राजूमामा भोळे, अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील या कर्मचाऱ्यांच्या सन्मानामुळे संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे महसूल विभागाची प्रतिमा अधिक उजळली असून, इतरांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button