खान्देश

आसनखेडा ग्रा.पं.ला आयएसओ मानांकन !

आसनखेडा ग्रा.पं.ला आयएसओ मानांकन ! 
पाचोरा : तालुक्यातील आसनखेडा ग्रामपंचायतीस नुकतेच आय.एस.ओ. ९००:२०१५ हे मानांकन प्राप्त झाले. नुकतेच आयएसओ मानांकन प्रदान करणाऱ्या संस्थेने ग्रामपंचायतीस भेट देऊन आय.एस.ओ. निकषानुसार पडताळणी करून सर्व निकष पूर्ण केल्याने ग्रामपंचायतीस आय.एस. ओ. मानांकन दिले. आय.एस.ओ. मानांकन प्राप्त होणेकामी ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे सरपंच उषाबाई रवींद्र पाटील यांनी सांगितले. ‘जिल्हा परिषदेचचया मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे, गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. या कामासाठी विस्तार अधिकारी ए. जे. पाटील, आर.एस. धस, दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाबरोबरच तुळसे एंटरप्रायजेसचे जोशी यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले,’ असे ग्रामपंचायत अधिकारी नंदकिशोर जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button