मोटर सायकल चोर भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या जाळ्यात चोरीची दुचाकी केली हस्तगत!

जळगाव :-(प्रतिनिधी) :- दिनांक 24.11.2023 रोजी 17.05 ते 20.30 वा. दरम्यान फिर्यादी नामे सिमा रविंद्र पाटील वय- 32 खाजगी नोकरी रा मामाजी टॉकीज जवळ, जुनी जीन गमाडीया प्रेस, भुसावळ ता- भुसावळ जिल्हा-जळगाव हे ते काम करीत असलेले नवजीवन क्लिनीक, प्रीमीयर हॉटल च्या पाठीमागे कामावर गेले असता सदर ठिकाणी त्यांनी लावलेली त्यांचे मालकीची मोटर सायकल ही कोणातरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमती वाचुन लबाडीचे ईराद्याने चोरुन नेली होती वगैरे मचकुरच्या फिर्याद वरुन भुसावल बाजारपेठ पो स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना गोपनिय माहीती मिळाली की, ईसम नामे मेघराज चंदु भोई रा गवळी वाडा मामाजी टॉकीज जवळ भुसावळ हा होन्डा एव्हीएटर कंपनीची चोरीची मोटर सायकल घेवुन फीरत आहे. म्हणुन सदर संशयीत आरोपीतास शोधुन ताब्यात घेणे काणी भुसावळ बाजारपेठ पो स्टे चे मा. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड साहेब यांना एक पथक तयार करुन सदर आरोपीताचा शोध घेणे कामी भुसावळ शहरात रवाना केले असता संशईत आरोपी नामे मेघराज चंदु भोई रा गवळी वाडा मामाजी टॉकीज जवळ भुसावळ हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याने सांगीतले की गुन्ह्यातील गेला माल 1) 10,000/ रु कीं ची हॅन्डा एव्हीएटर काळ्या रंगाची मोटर सायकल क्रं एम एच 19 बिएच 0898 ही त्याने त्याचे साथीदारा माफर्त चोरी केली आहे. सदर ची मोटर सायकल ही दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आली असुन त्यास सदर गुन्ह्याचे पुढील चौकशी कामी अटक करण्यात आली आहे. सदर ची कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार जिल्हा जळगाव, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते जिल्हा-जळगाव, उपविभागीय पोलिस अधि. क्रीष्णांत पिंगळे भुसावळ भाग, भुसावळ, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो स्टे चे गुन्हे शोध पथकातील सपोनि हरीष भोये, उ.नि मंगेश जाधव, पो हे कॉ रमण सुरळकर, पो हे कॉ उमाकांत पाटील, पो हे कॉ निलेश चौधरी, पो हे कॉ समाधान पाटील, पो कॉ प्रशांत परदेशी, पो कॉ योगेश माळी, पोकों अगर अढाळे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो हे कॉ रमण सुरळकर करीत आहे.



