खान्देश

आमदारांबरोबर बौद्ध बांधव साधणार संवाद, मेळाव्याचे आयोजन!

आमदारांबरोबर बौद्ध बांधव साधणार संवाद,

*रविवारी पाचोर्‍यात संवाद मेळाव्याचे आयोजन*

पाचोरा (वार्ताहर) दि.28 आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘चला एक होऊया समाज हितासाठी लोकप्रतिनिधींशी संवाद साधूया’ या शीर्षकाखाली पाचोरा तालुक्यात प्रथमच

बौद्ध समाज संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मतदार संघातील अनेक गावातील प्रलंबित प्रश्न,वाड्या वत्यांमधील नागरी समस्या, घरकुल, रस्ते सामाजिक सभागृह, सभा मंडपे, शौचालय आदी विषयांची सोडवणूक व्हावी व दलित वस्ती भागात झालेल्या कामांची उजळणी व्हावी यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या समवेत बौद्ध समाजाचा संवाद मिळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला सिडकोचे अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाठ हे उपस्थित राहणार आहेत. संजय शिरसाट यांची नुकतीच सिडकोच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या देखील सत्काराचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील मोंढाळा रोड स्थित तुळजाई जिनिंगच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास पाचोरा तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक उपासिका यांना आमंत्रित केले असून या ठिकाणी बांधव आमदार किशोर  पाटील यांच्याशी संवाद साधणार असून आपल्या मागण्यांची मांडणी करणार आहेत

दरम्यान या मेळाव्याला पाचोरा तालुक्यातील बौद्ध समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाचोरा तालुका बौद्ध समाज संवाद समितीच्या वतीने करण्यात आले आहे

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button