क्रीडाखान्देश

सौ. सिंधुताई शिंदे प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी, चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी ठरली आकर्षण

सौ. सिंधुताई शिंदे प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी, चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी ठरली आकर्षण

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडीचेही आयोजन

[पाचोरा ], दि. ०४/०७/२०२५:

आज शुक्रवार, दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी सौ. सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेमध्ये देवशयनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांची विठ्ठल-रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील भव्य दिंडी आयोजित करण्यात आली होती. सोबतच ‘वृक्ष दिंडी’ काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

शाळेच्या परिसरातून आणि नजीकच्या कॉलनी भागातून ‘पांडुरंग… पांडुरंग… विठ्ठल… विठ्ठल’ च्या गजरात निघालेल्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल-रुक्मिणी आणि लहान वारकऱ्यांच्या वेशात सजलेल्या चिमुकल्यांचे परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले आणि त्यांचे मनभरून कौतुक केले. या दिंडीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अमोलभाऊ शिंदे, पूजाताई शिंदे आणि सौ. सा. प. शिंदे शाळेचे मुख्याध्यापक सु. ना. पाटील  उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ. सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समाधान माधवराव महाजन यांनी केलेल्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आणि दिंडीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सहशिक्षक प्रदीप सुनील शिंदे  यांनी केले, तर जयश्री लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पालक बंधू-भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्यांचा उत्साह वाढवत होते. ‘पांडुरंग पांडुरंग’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button