रामेश्वरममध्ये जनसेवक बंडू सोनार यांच्या यशासाठी तरुणांचे साकडे – पाचोर्यातून उमटतेय जनतेचा आवाज!

रामेश्वरममध्ये जनसेवक बंडू सोनार यांच्या यशासाठी तरुणांचे साकडे – पाचोर्यातून उमटतेय जनतेचा आवाज!
पाचोरा, दि. 25 जून 2025 (सकाळी 10 वा.): पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये सध्या एकच नाव चर्चेत आहे – बंडूभाऊ केशव सोनार! जनसेवेची निःस्वार्थ भावना, सातत्याने समाजासाठी केलेलं कार्य आणि कुठलंही पद नसताना कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता दिलेली सेवा यामुळे बंडू सोनार यांनी लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून बंडू सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. गरजूंसाठी मदतीचा हात, रुग्णांसाठी तातडीची मदत, तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्याची तत्परता – यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा भरवसा वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर, प्रभाग आठमधील नागरिकांच्यावतीने बंडू सोनार हे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर आणि आमदार किशोर पाटील यांच्या आशीर्वादाने उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, पाचोर्यातील जय अविनाश सोमवंशी आणि त्यांच्या सोबतचे अनेक तरुण रामेश्वरम (तामिळनाडू) येथील पवित्र रामनाथस्वामी मंदिरात गेले असता, त्यांनी भगवान महादेवाचे दर्शन घेतले आणि बंडू सोनार यांना यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळो, अशी मनोभावे प्रार्थना केली. हे साकडे म्हणजे बंडू सोनार यांच्यावर जनतेचा विश्वास आणि आस्था अधोरेखित करणारी घटना म्हणावी लागेल.
बंडू सोनार यांची लोकप्रियता केवळ त्यांचं कामच नव्हे तर त्यांची नम्रता, सर्वसामान्यांशी असलेला संपर्क आणि आपुलकीने केलेली जनसेवा पाहता, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.



