महाराष्ट्र

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन: देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री आणि चौका येथे विशेष उपक्रम

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन: देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री आणि चौका येथे विशेष उपक्रम

छत्रपती संभाजीनगर: ‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’ या उक्तीला सार्थ ठरवत, महाराष्ट्राचे कार्यकुशल नेतृत्व आणि अभ्यासू मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री आणि चौका (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी, सौ. पुष्पाताई प्रकाश काळे (जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा, छ. संभाजीनगर उत्तर ग्रामीण व मा. सदस्या, जि. प. छ. संभाजीनगर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, कृ. उ. बा. स. सभापती श्री. राधाकिसन पठाडे, श्रीमती. मंगलाताई वाहेगावकर, सौ. सविता फुके, सौ. गंगाताई ताठे, मंडळाध्यक्ष सुचित बोरसे, शिवाजीराव वाघ, श्रीमती. सरसाताई वाघ, शिवाजीराव पाथ्रीकर, सांडू आण्णा जाधव, इलियास शहा, बाळासाहेब सोटम, नरेंद्र देशमुख, योगेश मिसाळ, रवींद्र काथार, गजानन नागरे, ऐश्वर्या गाडेकर, बाळासाहेब तांदळे, राजेंद्र टकले, अतुल जाधव, अरुण गाडेकर, बाबासाहेब शिंगारे, राऊत मामा, अरुण वाहतुळे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या शिबिरातून जमा झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button